कन्नड ते चाळीसगाव दरम्यानच्या औट्रम घाटाचा इतिहास
हा घाट महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा 2 नंबरचा घाट आहे. 9 किलोमीटरच्या घाटास 29 वळणं असून 4 वळणं अतिशय धोकेदायक असे बरोबर व्ही आकाराचे आहेत. घाटास लागून आजूबाजूस पाटणादेवी अभयारण्य आहे. बिबटे ,लांडगे अशा असंख्य वन्य प्राण्यांचा अगदी घाटापर्यंत वावर असतो. निसर्ग संपन्न असलेला हा परिसर मन मोहित करतो. अनेक धबधबे पावसाळ्यात घाटातून प्रवास करताना नजरेस पडतात. चाळीसगाव पासून हा घाट 8 किलोमीटर अंतरावर आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वर 9 किमी लांबीच्या महाराष्ट्रातील प्रमुख घाटापैकी एक असणार्या कन्नड चाळीसगाव दरम्यानच्या ओट्राम घाटाच्या निर्मितीचा इतिहास मोठा रंजक आहे. उत्तर भारतातून दक्षिणेत जाण्यासाठी अजिंठ्याचा डोंगर पालथा घालवा लागतो. याकरिता आपणास रांजनगाव आणि अजिंठा पास फर्दापूर येथून जावे लागते. प्राचीनकाळी मात्र खानदेशातून मराठवाड्यात येण्यासाठी विविध नावाने छोटे मोठे घाट होते. ज्याची आज फक्त नावानेच चर्चा करावी लागते. 1. कालघाट – पाटणा ते आंबा ( कन्नडजवळील पाटणा गणितीतज्ञ भास्कराचार्याचे गाव 2. घायघाट – अहंकारी ते आंबा 3. गणेशघाट – पाटणा ते कलंकी 4. हणवत घाट – पिंपळनेर