Posts

Showing posts from July, 2022

कन्नड ते चाळीसगाव दरम्यानच्या औट्रम घाटाचा इतिहास

Image
हा घाट महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा 2 नंबरचा घाट आहे. 9 किलोमीटरच्या घाटास 29 वळणं असून 4 वळणं अतिशय  धोकेदायक असे बरोबर व्ही आकाराचे आहेत. घाटास लागून आजूबाजूस पाटणादेवी अभयारण्य आहे. बिबटे ,लांडगे  अशा असंख्य वन्य प्राण्यांचा अगदी  घाटापर्यंत वावर असतो. निसर्ग संपन्न असलेला हा परिसर मन मोहित करतो. अनेक धबधबे पावसाळ्यात घाटातून प्रवास करताना नजरेस पडतात. चाळीसगाव पासून हा घाट 8 किलोमीटर अंतरावर आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वर 9 किमी लांबीच्या महाराष्ट्रातील प्रमुख घाटापैकी एक असणार्‍या कन्नड चाळीसगाव दरम्यानच्या ओट्राम घाटाच्या निर्मितीचा इतिहास मोठा रंजक आहे. उत्तर भारतातून दक्षिणेत जाण्यासाठी अजिंठ्याचा डोंगर पालथा घालवा लागतो. याकरिता आपणास रांजनगाव आणि अजिंठा पास फर्दापूर येथून जावे लागते.  प्राचीनकाळी मात्र खानदेशातून मराठवाड्यात येण्यासाठी विविध नावाने छोटे मोठे घाट होते. ज्याची आज फक्त नावानेच चर्चा करावी लागते.  1. कालघाट – पाटणा ते आंबा ( कन्नडजवळील पाटणा गणितीतज्ञ भास्कराचार्याचे गाव  2. घायघाट – अहंकारी ते आंबा 3. गणेशघाट – पाटणा ते कलंकी  4. हणवत घाट – पिंपळनेर

औरंगाबादच्या नामांतराचा इतिहास

Image
इस पूर्व 250 ते इस 250 सातवाहन काळ - राजतडाग इस 1610 - खडकी इस 1626 - फत्तेनगर इस 1636 - खुजिस्ता बुनियाद इस 1657 - औरंगाबाद  29 जून 2022 - संभाजीनगर 15 जुलै 2022 - छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीराजे यांची अविस्मरणीय छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) भेट !!! छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला जाण्यापूर्वी औरंगाबादेस मुक्काम केला होता. ही नोंद जयपूर रेकॉर्ड्समध्ये 'हाऊस ऑफ शिवाजी', 'जदुनाथ सरकार' आणि 'सय्यद हुसैन बिलग्रामी' यांच्या नावाने केलेली आढळते. वसंत ॠतूत शहर हिरवळीच्या चादरीने नटले होते. शिवाजी महाराजांचे याच मोसमात शहरात आगमन झाले. तो दिवस होता ५ मार्च १६६६. ज्येष्ठ सुपुत्र संभाजी राजे त्यांच्यासमवेत होते.बादशहा औरंगजेबाच्या निमंत्रणावरून महाराज आग्र्याला जाण्यासाठी आपल्या प्रमुख सरदारांना सोबत घेऊन निघाले होते. राजपूत राजे जयसिंग यांच्या आग्रहाखातर महाराजांनी औरंगाबाद शहरात मुक्काम ठेवला.त्यांच्यासमवेत हिरोजी फर्जंद, भोसले, तानाजी, येसाजी कंक, बाजीराव सर्जेराव जेधे आणि निवडक ४००सरदार होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनाची खबर शहरा