Posts

Showing posts from July, 2019

संयुक्त गट ब मुख्य परीक्षा पेपर कसा सोडवावा ?

Image
🔰 संयुक्त मुख्य परीक्षा  My Strategy : मित्रांनो बरेच जण फोन करून शेवटचे 7 दिवसांत काय करावे व पेपर कसा सोडवावा विचारत आहेत . 50+30+20 चा नवीन पॅटर्न नुसार ही दुसरी परीक्षा होत आहे. मागील वर्षी 81 मार्क मिळवून मी राज्यात पेपर 1 मध्ये पहिला होतो.त्यामुळे तुम्हां सर्वांना मी काही Tips देऊ इच्छितो. 1) अपवाद : मराठी आणि इंगजी व्याकरणाच्या नियमातील सर्व काही पाठ करायच्या भानगडीत न पडता फक्त अपवाद पुन्हा एकदा वाचा ,लक्षात ठेवा. प्रश्न नेहमी 'अपवाद'वरच येत असतात. 2) मो रा वाळिंबे सतत Revise करा. पाल सूरी मधील 100 Common Error टॉपिक कमीत कमी 3 वेळा वाचा. vocabulary रोज सकाळी Revise करा. 3) चालू घडामोडी वाचताना मागच्या 1 वर्षातील ठळक घडामोडी च वाचा.त्या वाचतांना त्या बातमितील वेगळेपण अधोरेखित करून लक्षात ठेवा,आयोग नेहमी 3-4 वाक्य टाकून प्रश्न विचारते ,त्यामुळे चुकीचे उत्तर चटकन लक्षात येत नाही. 4) माहिती अधिकार व सेवा हक्क कायदा तोंडपाठ करा. 1-1 मार्क हा महत्त्वाचा आहे. 5)पेपर सोडवत असतांना Elimination Method काळजीपूर्वक वापरा. जोड्या लावा चे प्रश्न ,चार पैकी एक बरोबर