Posts

Showing posts from September, 2022

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन विशेष :- क्रांतिवीर काकासाहेब

Image
  क्रांतिवीर काकासाहेब देशमुख यांच्यासह कन्नड तालुक्यातील असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी केला निजामविरुध रक्त रंजित संघर्ष :---- देवगिरीचे साम्राज्य अंगाखांद्यावर खेळलेला मराठवाडा तब्बल दोनशे वर्षे गुलामीच्या जोखड्यात बांधलेला होता. मीर उस्मान अली खान याने त्याच्या सातव्या निजामाने कूटनीती व दहशतीच्या जोरावर जनतेला सर्व अपंग केले होते. हैदराबाद संस्थानातील जनतेचा असंतोष दडपून टाकण्यासाठी त्याने क्रूरकर्मा कासिम रझवी याला उभा केले होते. या रझाकाराच्या अत्याचाराने जनता हैराण झाली होती. आणि अखेर रझाकाराच्या अत्याचाराच्या विरोधात गौताळ्याची रानावनातील गवताची पाती पेटून उठली. गौताळ्याच्या गवताला भाले फुटले आणि सुरु झाला रक्त रंजित संघर्ष. आणि या संघर्षाचे नेतृत्व केले कन्नड तालुक्यातील करंजखेड या गावातील एका तरुणाने केलं त्या तरुणाचं नाव होतं क्रांतिसिंह काकासाहेब देशमुख. काकासाहेब देशमुख यांच्या रूपाने जनतेला एकच सेनापती मिळाला. शोषितांच्या असंतोषाला आवाज मिळाल्याने जनतेच्या मनात संघर्षाचे बळ निर्माण झाले. आणि क्रांतिवीर काकासाहेब यांनी मराठवाडा मुक्तीसाठी निझामाविरुध रणशिंग फुंकले. कन्नड