औरंगाबादच्या नामांतराचा इतिहास
इस पूर्व 250 ते इस 250 सातवाहन काळ - राजतडाग इस 1610 - खडकी इस 1626 - फत्तेनगर इस 1636 - खुजिस्ता बुनियाद इस 1657 - औरंगाबाद 29 जून 2022 - संभाजीनगर 15 जुलै 2022 - छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीराजे यांची अविस्मरणीय छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) भेट !!! छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला जाण्यापूर्वी औरंगाबादेस मुक्काम केला होता. ही नोंद जयपूर रेकॉर्ड्समध्ये 'हाऊस ऑफ शिवाजी', 'जदुनाथ सरकार' आणि 'सय्यद हुसैन बिलग्रामी' यांच्या नावाने केलेली आढळते. वसंत ॠतूत शहर हिरवळीच्या चादरीने नटले होते. शिवाजी महाराजांचे याच मोसमात शहरात आगमन झाले. तो दिवस होता ५ मार्च १६६६. ज्येष्ठ सुपुत्र संभाजी राजे त्यांच्यासमवेत होते.बादशहा औरंगजेबाच्या निमंत्रणावरून महाराज आग्र्याला जाण्यासाठी आपल्या प्रमुख सरदारांना सोबत घेऊन निघाले होते. राजपूत राजे जयसिंग यांच्या आग्रहाखातर महाराजांनी औरंगाबाद शहरात मुक्काम ठेवला.त्यांच्यासमवेत हिरोजी फर्जंद, भोसले, तानाजी, येसाजी कंक, बाजीराव सर्जेराव जेधे आणि निवडक ४००सरदार होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनाची खबर शहरा...