स्वामीनाथन आयोग व शिफारसी


National Commission on Farmers


स्वामिनाथन आयोग म्हणजे काय ?


हरित क्रांतीचे जनक मा. डॉ एम एस स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन सरकारने १८ नोव्हेंबर २००४ रोजी राष्ट्रीय कृषक आयोगाची स्थापना शेती व शेतकर्यांच्या विविध प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी या आयोगाची रचना करण्यात आली .
आयोगाने २००६ पर्यंत एकूण ६ अहवाल सादर केले. शेवटचा अहवाल ४ ऑक्टोबर २००६ रोजी सदर करीत आयोगाने शेतकऱ्यांचा दुरवस्थेची कारणे व त्यावर उपाय सुचवले .
खेदात्मक बाब हि कि दुसर्या दिवशी म्हणजे ५ ऑक्टोबर ला
 सरकारने कर्मचार्यासाठी सहावा वेतन आयोगाची स्थापना करून २००८ मध्ये शिफारशी लागू केल्यात .अजून यात भर म्हणजे सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी पण सरकार लागू करायच्या तयारीत आहे आणि जवळपास १० वर्षे होऊन सुद्धा स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी धूळ खात पडलेल्या आहेत .


आयोगाच्या अहवालातील काही शिफारशी

  •     शेतकऱ्यांचे खर्च वजा जाऊन उत्पन्न सरकारी कर्मचार्याप्रमाणे असावे
  •      शेतमालाचा हमीभाव उत्पादन खर्च वगळता ५० % असावा
  •      शेतमालाची आधारभूत किमत लागू करण्याची पद्धत सुधारून गहू आणि इतर  खाद्यान्न वगळता इतर पिकांना आधारभूत किंमत मिळायची व्यवस्था करावी
  •      बाजाराच्या चढउतारापासून शेतकर्याचे संरक्षण व्हावे म्हणून ‘मूल्य स्थिरता        निधी’ ची स्थापना करावी
  •      आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीच्या दुष्परिणाम पासून शेतकऱ्यांचे संरक्षण         करण्यासाठी इतर देशामधून येणाऱ्या शेतमालाला आयात कर लावावा
  •      दुष्काळ व इतर आपत्तीपासून बचावासाठी ‘कृषी आपत्काल निधी’ ची स्थापना     करावी
  •      कृषी पतपुरवठा प्रणालीचा विस्तार करावा
  •      पिक कर्जावरील व्याजाचा दर कमी करावा
  •      हलाखीची स्थिती असेलेल्या क्षेत्रामध्ये ,नैसर्गिक आपत्ती वेळी ,पूर्वस्थिती         येईपर्यंत गैर्संस्थात्मक कर्जासाहित सर्व कर्जाची वसुली स्थगित करून            त्यावरील व्याज माफ करावे
  •     संपूर्ण देशातील सर्व पिकांना कमीत कमी हप्त्यावर विमा संरक्षण मिळेल अशा     रीतीने पिक विमा योजनेचा विस्तार व ‘ग्रामीण विमा विकास निधी’ ची         स्थापना करावी.
  •     पिकांच्या नुकसानीचे मूल्यमापन करत असताना ब्लॉक च्या एवजी गाव हा       घटक वापरून विमा संरक्षण द्यावे
  •     सामाजिक सुरक्षेचे जाळे निर्माण करून त्या अंतर्गत शेतकर्यासाठी वृद्धावस्थेत       आधार तसेच स्वास्थ्य विम्याची तरतूद करावी
  •     परवडणार्या दरात बी-बियाणे व इतर यंत्रसामुग्री उपलब्ध करून द्यावी
  •     संपूर्ण देशात प्रगत शेती व माती परीक्षण प्रयोगशाळेचे संचालन
  •     शेतीला कायम आणि सम प्रमाणात सिंचन आणि वीजपुरवठा व सिंचन          व्यवस्थेत आमुलाग्र सुधारणा घडवून आणाव्यात

       अधिक माहितीसाठी खालील लिंक वर जा
       Wikipedia : https://goo.gl/79gFzu
http://www.prsindia.org/administrator/uploads/general/1242360972~~final%20summary_pdf.pdf


शेतकरीहीतार्थ.......!

धीरज चव्हाण.. 
भूमिपुत्र ग्रामीण विकास प्रतिष्ठान

Popular posts from this blog

SEBC ( मराठा आरक्षण ) जातीचे प्रमाणपत्र कसे काढायचे ? वाचा संपूर्ण प्रक्रिया

संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान पुस्तक (Computer & IT) - धीरज चव्हाण

पैठणी साडीचा इतिहास व माहिती