युगप्रवर्तक छत्रपती शिवराय जयंती विशेष
जगाच्या इतिहासाला अनेक महान व्यक्तीनी आपल्या कार्याने नवे वळण दिले आहे ,पण यातील फार थोड्याच जणांना युगप्रवर्तक वा युगपुरुष या नावाने संबोधले जाते. छत्रपती शिवारायांनी तब्बल चारशे वर्षांपासून परचक्रात असलेल्या एका भूमीला व येथील रयतेला स्वातंत्र्याचा व फक्त स्वातंत्र्यच नव्हे तर स्वराज्याचं स्वप्न दाखवून ते साकार देखील केले. याबाबत सभासद (महाराजांचा समकालीन)म्हणतो ,"राजा साक्षात केवळ अवतारीच जन्मास येऊन पराक्रम केला. नर्मदेपासून रामेश्वरीपर्यंत द्वाही फिरविसी देश काबीज केला. आदिलशाहीस कुतुबशाही, निजामशाही, मोगलशाही या चारी परकीय पातशाह्या व समुद्रातील बेविस पातशहा फिरंगे असे जेर जप्त करून नवेच राज्य साधून हिंदवी स्वराज्य स्थापिले, सिंहासनाधीश छत्रपती जहाले. शककर्ते झाले, ए जातीचा कोणी मागे झाला नाही. पुढेही होणे नाही.' शिवरायांनी शून्यातून स्वराज्य निर्माण करून "हे राज्य अठरापगड जातीच्या रयतेचे आहे", "सर्वांस पोटास लावले आहे" हे देखील सांगितले ,यामुळे महाराज युगप्रवर्तक ठरतात. मनुष्य जीवन हे अत्यंत कष्टमय व संकटांनी भरलेले आहे,शिवराय