संयुक्त गट ब मुख्य परीक्षा पेपर कसा सोडवावा ?

🔰 संयुक्त मुख्य परीक्षा 

My Strategy :
मित्रांनो बरेच जण फोन करून शेवटचे 7 दिवसांत काय करावे व पेपर कसा सोडवावा विचारत आहेत .
50+30+20 चा नवीन पॅटर्न नुसार ही दुसरी परीक्षा होत आहे. मागील वर्षी 81 मार्क मिळवून मी राज्यात पेपर 1 मध्ये पहिला होतो.त्यामुळे तुम्हां सर्वांना मी काही Tips देऊ इच्छितो.

1) अपवाद : मराठी आणि इंगजी व्याकरणाच्या नियमातील सर्व काही पाठ करायच्या भानगडीत न पडता फक्त अपवाद पुन्हा एकदा वाचा ,लक्षात ठेवा. प्रश्न नेहमी 'अपवाद'वरच येत असतात.

2) मो रा वाळिंबे सतत Revise करा.
पाल सूरी मधील 100 Common Error टॉपिक कमीत कमी 3 वेळा वाचा. vocabulary रोज सकाळी Revise करा.

3) चालू घडामोडी वाचताना मागच्या 1 वर्षातील ठळक घडामोडी च वाचा.त्या वाचतांना त्या बातमितील वेगळेपण अधोरेखित करून लक्षात ठेवा,आयोग नेहमी 3-4 वाक्य टाकून प्रश्न विचारते ,त्यामुळे चुकीचे उत्तर चटकन लक्षात येत नाही.

4) माहिती अधिकार व सेवा हक्क कायदा तोंडपाठ करा. 1-1 मार्क हा महत्त्वाचा आहे.

5)पेपर सोडवत असतांना Elimination Method काळजीपूर्वक वापरा. जोड्या लावा चे प्रश्न ,चार पैकी एक बरोबर जोडी हेरून बरोबर पर्याय चटकन टिक करा.

6) जे प्रश्न sure येत असतील ते लगेच Answersheet वर गोल करून घ्या, ह्यामुळे तुमचे 5 मिनिटे वाचतात व त्याचा उपयोग तुम्ही पुढील प्रश्न सोडविताना  होतो,शेवटी गोल काळे करण्यामुळे ते गोंधळात चुकतात ,वेळ वाया जातो.

7) Avoid YZ Questions : काही प्रश्न हे निव्वळ आपला वेळ वाया घालवण्यासाठी दिलेले असतात ,असे काही प्रश्न Skip करत चला.

8)Attempt किती ठेवावा ? : ज्यांना STI/ASO द्यायचा आहे त्यांनी जरूर Attempt 90+ ठेवावा. PSI फोकस असणाऱ्यांनी 85-90 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा.

9) Be Positive:  काही जणांना पेपर सोडविताना घबराट होते, कृपया मनात आत्मविश्वास बाळगा ,पेपर सुरू होण्याच्या आधी 2 मिनिटे डोळे लावून आपण जिथून प्रेरणा घेता त्यांचे स्मरण करा.लक्षात ठेवा ही लढाई ही "स्व" ची "स्वतःशी"च आहे.

10)Avoid Silly Mistakes: प्रश्न नीट वाचत चला ,गोल काळे करतांना आधी option वर टिक करूनच गोल काळे करा,चूक /अचूक इ. शब्दाला underline करून option select करा.

11)पेपर च्या आधी फालतू गप्पा टाळून ,current वाचण्यावर भर दिला तर उत्तम.

12)तुक्के कसे माराल ?: सलग 4 पेक्षा जास्त उत्तराचे तुमचे पर्याय जर एकच येत असतील ,तर पुन्हा नीट प्रश्न वाचा,जे Sure आहेत तेच नीट टिक करा .पर्याय क्रमांक 1 व 4 किंवा All of the above चा वापर काळजीपूर्वक करा.

आपणा सर्वांना मुख्य परीक्षेसाठी शुभेच्छा💐💐आपण सर्वांनी निश्चित आपले ध्येय गाठावे,ही सदिच्छा

- धीरज नामदेवराव चव्हाण
STI 2018 (2nd Rank ,Open मध्ये 1ला)
ASO 2018 (Rank 29th)
SA, Cyber Crime(Rank 11 th)
(मागचा Combine Paper 1 score 81, Attempt 100)

Admin- t.me/eMPSCguidance

Comments

Popular posts from this blog

SEBC ( मराठा आरक्षण ) जातीचे प्रमाणपत्र कसे काढायचे ? वाचा संपूर्ण प्रक्रिया

संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान पुस्तक (Computer & IT) - धीरज चव्हाण

पैठणी साडीचा इतिहास व माहिती