सांगली-कोल्हापूर भागातील पूरग्रस्तांना मदत मोहीम
दिनांक 25 ऑगस्ट 2019 रोजीच्या माझा आणि वर्षाचा साखरपुड्याचे नियोजन महिनाभरापासून चालू होते. याच दरम्यान सांगली-कोल्हापूर भागातील पुराच्या बातम्या बघत होतो.अचानक उद्भवलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले होते. इकडे मी माझ्या संसार बसवण्याचा मार्गावर होतो.मनात बेचैन होतो ,कारण साखरपुड्यावरील अनावश्यक खर्च कसा टाळावा. मनात विचार सुचला की आपण हा खर्च टाळून पूरग्रस्त भागातील संकटग्रस्त कुटुंबांना मदत करावी. मग काय आधी बायकोला यासंबंधी मत विचारले ,तिने होकार दिला ,नंतर घरच्यांनी सुद्धा होकार दिला . 10 हजार रुपये चे नियोजन तोकडे असल्यामुळे मित्रांना मी माझे काम सांगितले त्यांना सर्वांना आवडले. मंत्रालयातील माझे सहकारी वर्गाने सुद्धा यात योगदान दिले व 40 हजार रुपये आपण जमा केले. यासाठी राज्यभरातून प्रतिसाद मिळाला. लाभार्थी कुटुंबे हरिपूर हे अत्यंत प्रेक्षणीय ठिकाण असून कृष्णा-वारणा संगमावर वसलेले आहे. गावातील 150 कुटुंबाचे घरे पुरामुळे उध्वस्त झाले आहेत. यासाठी आम्ही आधी ठरवलेले पिण्याच्या पाण्याच्या बॉटल देण्याचे नियोजन रद्द केले कारण 10000 प्लास्टिक बॉटल चा कचरा निर्माण होण्या