मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया | Chief Minister's Relief Fund, Maharashtra
मुख्यमंत्री सहायता निधी Chief Minister's Relief Fund, Maharashtra या सेवेमार्फत आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत त्यांना दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी शासनामार्फत अर्थसहाय्य्य केलं जातं. पात्रता : ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी आहे असे घटक हे अर्थसहाय्य्य मिळवण्यासाठी पात्र आहेत. नमूद आजार : हृदयशस्रक्रिया, किडणी, कर्करोग, मेंदु वरील उपचार, लिवर ट्रान्सप्लांट, अतिदक्षता विभागातील नवजात बालके, कोकलर इम्प्लांट सर्जरी (cochlear implant surgery) तसेच बोन मॅरो ट्रान्सप्लांट या आजारांवर उपचारासाठी हे अर्थसहाय्य दिलं जातं. ★ हे अर्थसहाय्य मिळवण्याच्या प्रक्रियेतील 3 टप्पे :- A. अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे जमा करणे. B. ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करणे. C. कागदपत्रे जोडलेला अर्ज मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात सादर करणे. A. अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे जमा करावेत १. अर्जदाराचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज २. रुग्णाचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड (रेशन कार्डमध्ये रुग्णाचे नाव नमूद असणे गरजेचे आहे) ३. तहसीलदार यांनी प्रमाणित केलेला उत्पनाचा दाखला