मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया | Chief Minister's Relief Fund, Maharashtra

मुख्यमंत्री सहायता निधी 

Chief Minister's Relief Fund, Maharashtra

 

 या सेवेमार्फत आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत त्यांना दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी शासनामार्फत अर्थसहाय्य्य केलं जातं.

  • पात्रता : ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी आहे असे घटक हे अर्थसहाय्य्य मिळवण्यासाठी पात्र आहेत.
  • नमूद आजार : हृदयशस्रक्रिया, किडणी, कर्करोग, मेंदु वरील उपचार, लिवर ट्रान्सप्लांट, अतिदक्षता विभागातील नवजात बालके, कोकलर इम्प्लांट सर्जरी (cochlear implant surgery) तसेच बोन मॅरो ट्रान्सप्लांट या आजारांवर उपचारासाठी हे अर्थसहाय्य दिलं जातं.


 ★हे अर्थसहाय्य मिळवण्याच्या प्रक्रियेतील 3 टप्पे :-
A. अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे जमा करणे.
B. ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करणे.
C. कागदपत्रे जोडलेला अर्ज मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात सादर करणे.


A. अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे जमा करावेत

१.अर्जदाराचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज  

२. रुग्णाचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड (रेशन कार्डमध्ये रुग्णाचे नाव नमूद असणे गरजेचे आहे)
३. तहसीलदार यांनी प्रमाणित केलेला उत्पनाचा दाखला (उत्पन्न 1.60 लाख  रुपयांपेक्षा कमी असावे)  

६. वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक /प्रमाणपत्र यांची मूळ प्रत .डॉक्टरांच्या शी शिक्क्यासह (खासगी रुग्णालय असल्यास सिविल सर्जन कडून टी प्रमाणित करणे आवश्यक )  .

तसेच रुग्णालयाकडून आपण अजून एक पत्र घेतो या पत्रात, रुग्णालयाच्या लेटरहेडवर, रुग्णालयाचे बँक अकाउंट डिटेल्स, आईएफएससी कोड, ई-मेल आयडी चा तपशील नमूद करवून घ्यायचा आहे.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बँकेचे जे अकाउंट आहे ते रुग्णालयाच्या नावावर असणे गरजेचे आहे, कोणत्याही वैयक्तिक अकाउंटवर अर्थसहाय्य दिलं जात नाही. 

७. जर आपण अपघातावर उपचार करून घेत असाल तर अपघातबद्दल पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर अर्थात तक्रारीची प्रत जोडणे आवश्यक आहे.
८. किडनी किंवा लिव्हर ट्रान्सप्लांटच्या केसमध्ये रुग्णालयीन कमिटीचा रिपोर्ट आपल्याला जोडावा लागेल.
९. आमदार किंवा खासदार याचं शिफारस पत्र (जर आपल्याला शिफारस पत्र मिळत नसेल तर काळजी करण्याचं कारण नाही कारण हि गोष्ट बंधनकारक नाही)

B.   थेट अर्ज मंत्रालयात ऑफिसमध्ये पोहोच करू शकता किंवा ऑनलाईन अर्ज करू शकता.

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी खालील अर्ज download करून भरावा.

                                                             ऑफलाईन अर्ज DOWNLOAD करा


आता आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते पाहूया

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या वेबसाईटला भेट द्या. 

https://cmrf.maharashtra.gov.in/  या वेबसाईटवर जाऊन "ऑनलाईन अर्ज करा" हा पर्याय निवडा, हा पर्याय निवडल्यावर आपल्यासमोर एक फॉर्म प्रदर्शित होईल तो फॉर्म भरा. फॉर्म अगदी सोपा आहे, आपण तो सहजपणे भरू शकाल. 

फॉर्म भरून झाल्यावर तो सबमिट करा. या फॉर्मच्या दोन प्रिंट घ्या, एक जमा करण्यासाठी आणि एक आपल्या नोंदीकरिता.


C. कागदपत्रे जोडलेला अर्ज मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात सादर करणे.

आता या फॉर्मला आपण जमा केलेली आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडा.
आपला हा अर्ज आता आपल्याला मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाला सादर करायचा आहे. 

सादर करण्याच्या दोन पद्धती आहेत, एकतर हा अर्ज आपण पोस्टाने पाठवू शकतो किंवा थेट जाऊन देऊ शकतो. जर आपण थेट जाऊन हा अर्ज जमा करणार असाल तर मंत्रालयात सातव्या मजल्यावर मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचं कार्यालय आहे. जर आपल्याला पोस्टाने हा अर्ज पाठवायचा असेल तर कार्यालयाचा पत्ता पुढीलप्रमाणे: 

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, 

मुख्यमंत्री कार्यालय, ७ वा मजला, 

मंत्रालय, मुख्य इमारत, 

मुंबई-४०००३२ 

दूरध्वनी क्रमांक - ०२२-२२०२६९४८


(अनुभवातून असे लक्षात येते की, बऱ्याच जणांना ऑनलाईन अर्ज भरताना खूप अडचणी येतात अशावेळी आपण सगळी कागदपत्रे घेऊन मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष येथे भेट द्यावी आणि ऑफलाईन पध्द्तीने आपला अर्ज जमा करावा. )

आपण अर्ज जमा केल्यानंतर, आपला अर्ज पडताळला जातो आणि सर्व माहिती बरोबर असल्यास आपल्या रुग्णालयाच्या बँक अकाउंटवर पैसे पाठवले जातात.


पैसे पाठविल्याची माहिती देणारं एक पत्र आपल्या रुग्णालयाला आणि आणि एक पत्र अर्जदाराला पाठवलं जातं.

अश्याप्रकारे आपण मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत अर्थसहाय्य मिळवू शकतो.

मुख्यमंत्री सहायता निधीबाबत आपले काही प्रश्न असतील तर ते कंमेंट्स मध्ये लिहा आम्ही आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू.



धन्यवाद !!!

Comments

Popular posts from this blog

SEBC ( मराठा आरक्षण ) जातीचे प्रमाणपत्र कसे काढायचे ? वाचा संपूर्ण प्रक्रिया

संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान पुस्तक (Computer & IT) - धीरज चव्हाण

पैठणी साडीचा इतिहास व माहिती