मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन विशेष :- क्रांतिवीर काकासाहेब

 


क्रांतिवीर काकासाहेब देशमुख यांच्यासह कन्नड तालुक्यातील असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी केला निजामविरुध रक्त रंजित संघर्ष :---- देवगिरीचे साम्राज्य अंगाखांद्यावर खेळलेला मराठवाडा तब्बल दोनशे वर्षे गुलामीच्या जोखड्यात बांधलेला होता. मीर उस्मान अली खान याने त्याच्या सातव्या निजामाने कूटनीती व दहशतीच्या जोरावर जनतेला सर्व अपंग केले होते. हैदराबाद संस्थानातील जनतेचा असंतोष दडपून टाकण्यासाठी त्याने क्रूरकर्मा कासिम रझवी याला उभा केले होते. या रझाकाराच्या अत्याचाराने जनता हैराण झाली होती. आणि अखेर रझाकाराच्या अत्याचाराच्या विरोधात गौताळ्याची रानावनातील गवताची पाती पेटून उठली. गौताळ्याच्या गवताला भाले फुटले आणि सुरु झाला रक्त रंजित संघर्ष. आणि या संघर्षाचे नेतृत्व केले कन्नड तालुक्यातील करंजखेड या गावातील एका तरुणाने केलं त्या तरुणाचं नाव होतं क्रांतिसिंह काकासाहेब देशमुख. काकासाहेब देशमुख यांच्या रूपाने जनतेला एकच सेनापती मिळाला. शोषितांच्या असंतोषाला आवाज मिळाल्याने जनतेच्या मनात संघर्षाचे बळ निर्माण झाले. आणि क्रांतिवीर काकासाहेब यांनी मराठवाडा मुक्तीसाठी निझामाविरुध रणशिंग फुंकले. कन्नड सोयगाव च्या डोंगरातून गावागावातून व्यायाम शाळेच्या माध्यमातून करंजखेड, पिशोर, घाटनांद्रा, पळशी, चिंचोली, गोंदेगाव, पातोंंडा, खडकदेवळा, हस्ता, मेहगाव, वासडी, नागद, घाटशेंद्रा, नेवपुर, नागापूर, नाचनवेल अशा अनेक गावातून सामान्य कुटुंबातील तरुणांना सोबत घेऊन गौताळ्यातील अंतुर किल्ल्यावर तिरंगा फडकवून निजामाविरुद्ध एल्गार पुकारला आणि तेथेच सुरू झाला मराठवाडा मुक्तीसंग्रामचा रक्त रंजीत संघर्ष. त्यावेळी नागापूर परिसरात रझाकरणी छळवाद मांडला होता. जनतेवर अत्याचार करत होता. नागापूर येथील शहानुर आडगाव येथे पोलीस कॉन्स्टेबल होता. त्याने दोन हिंदु तरुणीनां पळवून आडगाव येथील एका उसाच्या मळ्यात लपून ठेवले होतं. तो त्यांच्यावर अत्याचार करीत असत. की बातमी आजूबाजूच्या खेड्यापाड्यांमध्ये पसरली. आजूबाजूचे सर्व लोकांनी आडगाव येथे जाऊन उसाच्या मळ्याला वेढा दिला व गोळीबार सुरु केला. परंतु काही उपयोग झाला नाही लोकांनी उसाच्या शेतातील आग लावण्याची धमकी दिली तेव्हा शहानुर घाबरला शेतातून हळूहळू बांधावर आला इकडे तिकडे कोणी नाहीये पण हळूच पळाला. त्या मुलींना घेऊन त्यांच्या गावात पोचविण्याचे लोकांनी ठरवलं. पुढे अर्ध्या रस्त्यात गेल्यावर त्या दोन्ही मुलींनी पाणी पिण्याचा निमित्त करून त्या विहीरवर वर गेल्या तेव्हा त्यातल्या एका मुलीने विचार केला की आपण गावी गेलो तर समाज आपल्याकडे वेगळे भावनेने पाहिल म्हणून उडी मारून आत्महत्या केली. लोक शहानुर वर प्रचंड चिडला  होता. त्यांच्याविरुद्ध येथे वातावरण तापू लागल्याने त्यांने आपली बदली करून तो आपल्या गावी नागापूर इथे आला. तेथे ही त्याने असेच लोकांवर अत्याचार सुरू केले होते. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. या शहानुर व मुनीर या दोघांनी लोकांना अक्षरशः त्रासून सोडल्यामुळे धामणी येथील हिरामण नाईक, सावरगावचा सुक्रास भिल, सायगाव येथील राजा भिल्ल यांनी धामणी, चिमणापूर, सावरगाव, उंबरखेडा, टाकळी अंतुर, नेवपुर, आडगाव या गावच्या भिल्लांना व इतर लोकांना एकत्र करून एके दिवशी संध्याकाळच्या सुमारास यांंनी या दोघावर हल्ला केला. परंतु शहानूर व मुनीर कडे मोठा शस्त्रसाठा असल्यामुळे त्याने बेछूट गोळीबार केला त्यात हस्त्याचे निळ, देवपुळचे बाजीराव काजे, चिमनापुरचे रामभाऊ सोळुंके, वाकोदचे पाटील बुवा मनगटे, पिशोरचे मोकासे हे पाच जण हुतात्मे झाले. हि बातमी काकासाहेब कळाली. काकासाहेबांनी थेट नागापुर गाठले. दोन तीन हजार जनसमुदाय जमलेला होता. काकासाहेबांनी शहानुर च्या भाऊबंदाना बोलावुन घेतले व घडलेल्या घटनेबद्दल विचारले पण त्यांनी काकासाहेबांना चुकीची माहिती दिली. पण काकासाहेबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही शहानुरला माझ्या समोर हजर केलं नाही तर तुम्हाला मी खतम केल्याशिवाय राहणार नाही. नातेवाईकांनी शहानूर काकासाहेबांच्या ताब्यात दिला. काकासाहेबांनी त्याच्या दंडाला काढण्या बांधण्यात सांगितलं. त्यावर शहानूर काकासाहेबांना म्हणाला मी तुम्हाला शरण आलो आहे. तुम्ही मला जिथे नेयाल तिथे मी येण्यास तयार आहे. त्यावर काकासाहेब त्याला म्हणाले अरे तू शेर आहेस केव्हा झडप घालशील व ते सांगता येणार नाही म्हणून त्याच्या दंडाला काढण्या बांधून कंरजखेडा येथे घेऊन आले. शहानुर कंरजखेडला आल्यानंतर तिरंगी झेंड्याचे स्तंभाला त्याला बांधलं. गावातील व परगावातुन आलेले दोन ते तीन हजार जनसमुदायाला काकासाहेबांनी विचारलं आता या शहानुरचे काय करायचं. तेव्हा सर्वांनी सांगितलं की त्याला ठार मारा असे म्हणताच काकासाहेबांनी शहानुर तीन गोळ्या झाडल्या आणि क्रुरकर्मा शहानुर मारला. शेकडो मुजोर रझाकार कापुन विहिरीत फेकले या घटनेनंतर अनेक वर्ष कंरजखेडा गाव धगधगत राहिले.

Comments

Popular posts from this blog

SEBC ( मराठा आरक्षण ) जातीचे प्रमाणपत्र कसे काढायचे ? वाचा संपूर्ण प्रक्रिया

संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान पुस्तक (Computer & IT) - धीरज चव्हाण

पैठणी साडीचा इतिहास व माहिती