शनी नस्तनपुरच्या खोजा राजाची अनोखी गढी...!
नाशिक जिल्ह्यातील नांदगांव तालुक्यात प्रभू रामचंद्र यांनी स्थापन केलेले शनी महाराज देवस्थान श्रीक्षेत्र नस्तनपुर येथे आदिवासी भिल्ल राजा खोजा नाईक याची भुईकोट किल्लेवजा गढी नामशेष होण्याच्या वाटेवर आहे. नस्तनपुर परिसरात भिल्ल समाजाची वस्तीत खोजा नाईक शेती करून उदरनिर्वाह करीत असे. तो शनी महाराजांचा भक्त , कोणतेही काम शनी देवतेचे स्मरून तो करी. एके दिवशी शेतात नांगरणी सुरू असता दगडात नांगर अडकताच तो सोन्यासारखा चमकू लागला. काही वेळात तो दगड म्हणजे ' परिस ' असल्याचे त्याच्या लक्षात आले. अशा त-हेने तो अल्पावधीतच गर्भ श्रीमंत झाला. पुढे त्याला आपल्याकडे असलेल्या संपत्तीच्या संरक्षणासाठी गढी बांधण्याच त्यानं ठरवलं , गढीच्या पायात एका बुरूजात श्री गणेशाची स्थापना करून त्याने सुंदर गढी उभारली ती ही गढी आज शेवटच्या घटका मोजत आहे. या गढीतनं खोजा राजाला " दिल्लीचा दिवा " पहायचा होता म्हणुन उंचच उंच बुरूज निर्माण करण्याची त्याची ईच्छा होती. इंग्रजांकडुन मुंबई भुसावळ रेल्वे लाईन टाकण्यासाठी सर्वेक्षण काम सुरू होते. त्या कामात खोजा राजाची गढीच्या