Facebook चा वापर करताय सायबर गुन्हेगार : या सायबर हल्ल्यापासून सावधान राहा #CyberFraud

 ★ *जाहीर आवाहन* ★

⚡#Very_IMP_for_Facebook_user's


👉 *गेल्या काही दिवसांपासून प्रतिष्ठित व्यक्ती, युनिफॉर्मवर फोटो असलेल्या पोलीस आणि सुरक्षा दलातील लोकांच्या नावाचे सेम अकाऊंट फेसबूकला तयार करून तेच नाव, तोच प्रोफाइल फोटो ॲड करून ओरीजनल अकाऊंटच्या फ्रेंडलिस्ट मधिल मित्रांना रिक्वेस्ट पाठवली जाते*.. 


 *रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्यानंतर लगेच मॅसेंजरला Hii पाठवून #पैशांची #मागणी केली जाते व त्यासाठी अकाऊंट नंबर देखील पुरवला जातो.* 





*👉हे ओळखण्यासाठी काही गोष्टी नोटीस कराव्यात*.... 

1) जो कुणी आपला प्रतिष्ठीत मित्र आहे आणि तो आधीच आपल्या फ्रेंडलिस्टमधे असताना पुन्हा आलेली रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू नये.

2) नवीन आलेली फ्रेंड रिक्वेस्ट शक्यतो ज्याची आहे त्याला पर्सनली व्हेरीफाय करूनच ॲक्सेप्ट करावी.

3) #फेक #रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्यानंतर लगेच तो मॅसेंजरला येऊन Hii करतो.

4) मॅसेंजरवर तो #हिंदीत / #इंग्रजी मध्ये #संभाषण करतो.

5)माझे आधीचे अकाउंट काही कारणाने बंद झालंय असे सांगतो..

6) पैशांची अर्जंट गरज आहे अस सांगू शक्यतो Paytm खाते क्रमांक देतो.

7) *अशा कुठल्याच पैश्यांच्या मागणीला बळी पडू नका* ..


अशा फेक अकाऊंवरून रिक्वेस्ट आल्यास शक्यतो ती त्या मित्राकडून पर्सनली व्हेरीफाय केल्याशिवाय ॲक्सेप्ट करू नये आणि तो फेक आहे हे समजल्यावर अकाऊंट रिपोर्ट करावे..👍👍


- धीरज चव्हाण (STI-ASO)

माजी सहायक वैज्ञानिक ,सायबर गुन्हे अन्वेषण ,फॉरेन्सिक लॅब ,कलिना



#Be_Alert..

#New_cybercrime..

#CyberFraud

Comments

Popular posts from this blog

SEBC ( मराठा आरक्षण ) जातीचे प्रमाणपत्र कसे काढायचे ? वाचा संपूर्ण प्रक्रिया

संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान पुस्तक (Computer & IT) - धीरज चव्हाण

पैठणी साडीचा इतिहास व माहिती