SEBC ( मराठा आरक्षण ) जातीचे प्रमाणपत्र कसे काढायचे ? वाचा संपूर्ण प्रक्रिया
मराठा समाजाने विविध आंदोलन काढून आता पर्यंत मराठा आरक्षणाचा लढा लढला होता आणि आता त्या लढ्याला यश आले आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणाचा कायदा लागू केला आहे. विधीमंडळात मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. तर, राज्यपालांच्या सहीनंतर हा कायदा 1 डिसेंबरपासून राज्यात लागू झाला आहे. आता अनेकांना मराठा आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी काय करावे लागेल हे माहिती नाही. तर मराठा बांधवानी सर्वात अगोदर जात प्रमाणपत्र काढून घ्यावे लागेल. जातीचे प्रमाणपत्र काढल्यानंतरच मराठ्यांना आरक्षणाचा फायदा मिळणार आहे.तर पुढे पाहूया कसे जातीचे प्रमाणपत्र काढायचे तुमचा जातीचा पुरावा – सर्वप्रथम तुमच्या नावापुढे “मराठा” असा उल्लेख असणारा इयत्ता पहीली ते इयत्ता बारावी पर्यंतच्या कोणत्याही एका वर्गातील तुमचा शाळा सोडल्याचा दाखला काढा. पुर्वीच काढलेला असेल तर त्यापैकी एकाची सत्यप्रत(True Copy) घ्या. जर तुम्हाला असा दाखला मिळाला नाही आणि तुम्ही महाविद्यालयात शिकत असाल तर तिथुन बोनाफाइड सर्टिफिकेट काढा. परंतु बोनाफाइडवर तुमच्या जन्मतारीख व जातीचा उल्लेख असायला हवा, याची काळजी घ्या. 1
Comments
Post a Comment