एकाचवेळी 3 पदांवर निवड
*आडगाव-जेहुर येथील धीरज चव्हाण यांची 3 परीक्षेत बाजी*
ऑक्टोबर 2018 मध्ये MPSC द्वारे घेण्यात आलेल्या राज्य कर निरीक्षक परीक्षेत आडगाव-जेहुर येथील भूमिपुत्र धीरज नामदेवराव चव्हाण यांची 2 ऱ्या क्रमांकाने निवड झाली आहे ,तसेच आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या मंत्रालय सहायक कक्ष अधिकारी परीक्षेत देखील त्यांनी 29 व्या क्रमांकाने बाजी मारली आहे .नुकत्याच नोव्हेंबर मध्ये राज्य गृह विभागात ,न्यायवैद्यक प्रयोगशाळेत ,सहायक वैज्ञानिक पदी त्यांची राज्यात 11 व्या क्रमांकाने निवड झाली होती.3 पदे मिळवल्यामुळे पंचक्रोशीत आनंद व्यक्त होत आहे.त्यांचे वडील नामदेवराव चव्हाण वासडी के प्रा शा येथे मुख्याध्यापक पदावर आहेत.
त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी उपसभापती गीतराम पवार व गणेश शिंदे ,आडगाव चे सरपंच ज्ञानेश्वर निकम ,बिबखेडा येथील सरपंच आप्पासाहेब काळे ,सोसायटी चेयरमान अप्पासाहेब चव्हाण ,बाळूशेठ पवार ,संजय रिंढे, बाळू रिंढे,देविदास रिंढे ,अप्पा मंत्री ,शिवाजी पवार ,निवृत्ती शिंदे,शरद निकम ,विठ्ठल चव्हाण,दिनकर जठार ,बाळू झिमन ,निलेश शिंदे ,पूनम गायकवाड ,बाबासाहेब बहिरव ,संतोष चव्हाण,अक्षय झिमन ,उमेश झिमन ,संतोष ,शिंदे,संदीप पवार इ. जमले होते
Comments
Post a Comment