Posts

पैठणी साडीचा इतिहास व माहिती

Image
ताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे कुंच्या टोपडी शेले शाली त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी नारळी पदर जरी चौकडी रंग तिचा सुंदर धानी कवयित्री शांता शेळके यांनी पैठणीचे स्त्रीजनात असलेले हळवे स्थान मोजक्या शब्दांत किती सुंदरपणे गुंफले आहे! पैठणी म्हणजे महाराष्ट्रातील भरजरी पारंपरिक वस्त्रप्रकार. गर्भरेशमी, संपूर्ण जरीचा पदर आणि रुंद व ठसठशीत वेलबुट्टीचे काठ... पैठणीची ही प्राथमिक ओळख, तर संपूर्ण काठावर दोन्ही बाजूंनी एकसारखी वेलबुट्टी दिसणे हे तिचे खास वै‌शिष्ट्य. कपाट ढीगभर साड्यांनी भरलेले का असेना, विशेष प्रसंगी ठेवणीतील पैठणीच हवी, असा तमाम महिलावर्गाचा हट्ट असतो. त्यात ‘गृहमंत्री’ ठरवण्यासाठीच्या टीव्हीवरील ‘शो’ने पैठणी जिंकण्याच्या स्पर्धेला जन्म देऊन पैठणीप्रेमात भर घातली आहे.  नऊवारी ही मराठी स्त्रीची ओळख, तर पैठणी हे तिचे महावस्त्र! मराठा काळात पैठणची पैठणी महिलांमध्ये लोकप्रिय होती. पैठणीची रंगसंगती आणि पायाजवळच्या काठावर व पदरावर केले जाणारे जरीकाम तिला मौलिक ठेव्याचे वजन प्राप्त करून देत. मराठे स ...

ऑपरेशन पोलो व मराठवाडा मुक्तिसंग्राम

Image
ऑपरेशन पोलो  हैदराबाद विलीनीकरणासाठी भारतीय सेनेचे ऑपरेशन पोलो-  भारतीय सैन्याची हैदराबादवर चढाई. निजामाच्या असफिया घराण्याची राजवट १७२४ ते १९४८ पर्यंत सुमारे सव्वा दोनशे वर्षे होती. मीर उस्मान अलीखान बहादूर हे असफिया घराण्याचे सातवे राजे, त्यांची महत्वाकांक्षा मोठी होती.भारतात महत्वाच्या ठिकाणी मुस्लिम सत्तेचे अधिराज्य असावे असे त्यांना वाटत होते.हैदराबाद राज्याचे एकूण १६ जिल्हे होते. त्यात आंध्राचे ८, मराठवाड्याचे ५ व कर्नाटकाचे ३ जिल्हे होते. असे तेलगू, मराठी व कानडी भाषिक नागरिकांचे हैदराबाद संस्थान होते. नागरिकांच्या मातृभाषेला दुय्यम स्थान होते. राज्याची मुख्य भाषा म्हणून उर्दूला स्थान होते. सरकारी माध्यम उर्दू होते. त्यामुळे उर्दू हीच राज्याची भाषा सक्तीची होती. सर्व व्यवहार उर्दू माध्यमाद्वारे होत. प्राथमिक शाळेपासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत उर्दू माध्यमाद्वारे शिक्षण घ्यावे लागत असे. हैदराबाद संस्थान हे मुस्लिम राष्ट्र व्हावे म्हणून निजामाने भारतातील अरबी, फारशी भाषेच्या विद्वानांना बोलावून त्यांच्या प्रमुख जागी नियुक्त्या केल्या. हैदराबाद संस्थान हे देशात...

युगप्रवर्तक छत्रपती शिवराय जयंती विशेष

Image
जगाच्या इतिहासाला अनेक महान व्यक्तीनी आपल्या कार्याने नवे वळण दिले आहे ,पण यातील फार थोड्याच जणांना युगप्रवर्तक वा युगपुरुष या नावाने संबोधले जाते. छत्रपती शिवारायांनी तब्बल चारशे वर्षांपासून परचक्रात असलेल्या एका भूमीला व येथील रयतेला स्वातंत्र्याचा व फक्त स्वातंत्र्यच नव्हे तर स्वराज्याचं स्वप्न दाखवून ते साकार देखील केले. याबाबत सभासद (महाराजांचा समकालीन)म्हणतो ,"राजा साक्षात केवळ अवतारीच जन्मास येऊन पराक्रम केला. नर्मदेपासून रामेश्‍वरीपर्यंत द्वाही फिरविसी देश काबीज केला. आदिलशाहीस कुतुबशाही, निजामशाही, मोगलशाही या चारी परकीय पातशाह्या व समुद्रातील बेविस पातशहा फिरंगे असे जेर जप्त करून नवेच राज्य साधून हिंदवी स्वराज्य स्थापिले, सिंहासनाधीश छत्रपती जहाले. शककर्ते झाले, ए जातीचा कोणी मागे झाला नाही. पुढेही होणे नाही.' शिवरायांनी शून्यातून स्वराज्य निर्माण करून "हे राज्य अठरापगड जातीच्या रयतेचे आहे", "सर्वांस पोटास लावले आहे" हे देखील सांगितले ,यामुळे महाराज युगप्रवर्तक ठरतात. मनुष्य जीवन हे अत्यंत कष्टमय व संकटांनी भरलेले आहे,शिवराय ...

Information Technology Act 2008 [ माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८]

सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध

स्वामीनाथन आयोग व शिफारसी

Image
National Commission on Farmers स्वामिनाथन आयोग म्हणजे काय ? हरित क्रांतीचे जनक मा. डॉ एम एस स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन सरकारने १८ नोव्हेंबर २००४ रोजी राष्ट्रीय कृषक आयोगाची स्थापना  शेती व शेतकर्यांच्या विविध प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी या आयोगाची रचना करण्यात आली . आयोगाने २००६ पर्यंत एकूण ६ अहवाल सादर केले. शेवटचा अहवाल ४ ऑक्टोबर २००६ रोजी सदर करीत आयोगाने शेतकऱ्यांचा दुरवस्थेची कारणे व त्यावर उपाय सुचवले . खेदात्मक बाब हि कि दुसर्या दिवशी म्हणजे ५ ऑक्टोबर ला  सरकारने कर्मचार्यासाठी सहावा वेतन आयोगाची स्थापना करून २००८ मध्ये शिफारशी लागू केल्यात .अजून यात भर म्हणजे सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी पण सरकार लागू करायच्या तयारीत आहे आणि जवळपास १० वर्षे होऊन सुद्धा स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी धूळ खात पडलेल्या आहेत . आयोगाच्या अहवालातील काही शिफारशी       शेतकऱ्यांचे खर्च वजा जाऊन उत्पन्न सरकारी कर्मचार्याप्रमाणे असावे       शेतमालाचा हमीभाव उत्पादन खर्च वगळता ५० % असावा       शे...

संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान पुस्तक (Computer & IT) - धीरज चव्हाण

Image
स्पर्धा परीक्षा **संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान ** लेखक : धीरज चव्हाण  MPSC,STI-PSI-ASST मुख्य परीक्षा ,IBPS,PO व इतर सर्व स्पर्धा परीक्षा मधील संगणक घटकासाठी उपयुक्त ... वैशिष्ट्ये :   #VAT &GST  #IT  ACT2008  #CyberSecurity   #CLOUD  COMPUTING #Co mputer  Hardware &Software  #Data  Communication  #Mobile  and T.V. Communication  #Android   #IPV4 ,VOIP,Protocols  #ecommerce वरील सर्व घटकांची अत्यंत सोप्या पद्धतीने मांडणी ... मागील सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश   Click Here To Download Book