Posts

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रोख मदत

Image
  मराठवाड्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या 14 शेतकऱ्यांना(प्रत्येकी 3-5 हजार) दिवाळी भेट म्हणून आपल्या अधिकारी-कर्मचारी मित्र मंडळातर्फे 60 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. सहकार्य केल्याबद्दल सर्व अधिकारी कर्मचारी मित्रांचे धन्यवाद🙏🙏🙏 दिवाळीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा 💐💐💐

मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया | Chief Minister's Relief Fund, Maharashtra

Image
मुख्यमंत्री सहायता निधी  Chief Minister's Relief Fund, Maharashtra    या सेवेमार्फत आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत त्यांना दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी शासनामार्फत अर्थसहाय्य्य केलं जातं. पात्रता : ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी आहे असे घटक हे अर्थसहाय्य्य मिळवण्यासाठी पात्र आहेत. नमूद आजार : हृदयशस्रक्रिया, किडणी, कर्करोग, मेंदु वरील उपचार, लिवर ट्रान्सप्लांट, अतिदक्षता विभागातील नवजात बालके, कोकलर इम्प्लांट सर्जरी (cochlear implant surgery) तसेच बोन मॅरो ट्रान्सप्लांट या आजारांवर उपचारासाठी हे अर्थसहाय्य दिलं जातं.  ★ हे अर्थसहाय्य मिळवण्याच्या प्रक्रियेतील 3 टप्पे :- A. अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे जमा करणे. B. ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करणे. C. कागदपत्रे जोडलेला अर्ज मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात सादर करणे. A. अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे जमा करावेत १. अर्जदाराचा  ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज    २. रुग्णाचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड (रेशन कार्डमध्ये रुग्णाचे नाव नमूद असणे गरजेचे आहे) ३.  तहसीलदार या...

Facebook चा वापर करताय सायबर गुन्हेगार : या सायबर हल्ल्यापासून सावधान राहा #CyberFraud

Image
 ★ *जाहीर आवाहन* ★ ⚡#Very_IMP_for_Facebook_user's 👉 *गेल्या काही दिवसांपासून प्रतिष्ठित व्यक्ती, युनिफॉर्मवर फोटो असलेल्या पोलीस आणि सुरक्षा दलातील लोकांच्या नावाचे सेम अकाऊंट फेसबूकला तयार करून तेच नाव, तोच प्रोफाइल फोटो ॲड करून ओरीजनल अकाऊंटच्या फ्रेंडलिस्ट मधिल मित्रांना रिक्वेस्ट पाठवली जाते*..   *रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्यानंतर लगेच मॅसेंजरला Hii पाठवून #पैशांची #मागणी केली जाते व त्यासाठी अकाऊंट नंबर देखील पुरवला जातो.*  *👉हे ओळखण्यासाठी काही गोष्टी नोटीस कराव्यात*....  *  1) जो कुणी आपला प्रतिष्ठीत मित्र आहे आणि तो आधीच आपल्या फ्रेंडलिस्टमधे असताना पुन्हा आलेली रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू नये. 2) नवीन आलेली फ्रेंड रिक्वेस्ट शक्यतो ज्याची आहे त्याला पर्सनली व्हेरीफाय करूनच ॲक्सेप्ट करावी. 3) #फेक #रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्यानंतर लगेच तो मॅसेंजरला येऊन Hii करतो. 4) मॅसेंजरवर तो #हिंदीत / #इंग्रजी मध्ये #संभाषण करतो. 5)माझे आधीचे अकाउंट काही कारणाने बंद झालंय असे सांगतो.. 6) पैशांची अर्जंट गरज आहे अस सांगू शक्यतो Paytm खाते क्रमांक देतो. 7) *अशा कुठल्याच पैश्य...

10 वी 12वी नंतर विविध क्षेत्रातील करियरची संधी व मार्गदर्शन

Image
मोफत मार्गदर्शन 👆10 वी 12वी नंतर विविध क्षेत्रातील करियरची ओळख व मार्गदर्शनाची  राज्यातील सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सध्या  गरज आहे. https://youtu.be/mOUcBO7DE0g  सर्वांना नम्र विनंती की ही लिंक आपल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शेयर करावी 🙏🙏🙏

सांगली-कोल्हापूर भागातील पूरग्रस्तांना मदत मोहीम

Image
दिनांक 25 ऑगस्ट 2019 रोजीच्या माझा आणि वर्षाचा साखरपुड्याचे नियोजन महिनाभरापासून चालू होते. याच दरम्यान सांगली-कोल्हापूर भागातील पुराच्या बातम्या बघत होतो.अचानक उद्भवलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले होते. इकडे मी माझ्या संसार बसवण्याचा मार्गावर होतो.मनात बेचैन होतो ,कारण साखरपुड्यावरील अनावश्यक खर्च कसा टाळावा. मनात विचार सुचला की आपण हा खर्च टाळून पूरग्रस्त भागातील संकटग्रस्त कुटुंबांना मदत करावी. मग काय आधी बायकोला यासंबंधी मत विचारले ,तिने होकार दिला ,नंतर घरच्यांनी सुद्धा होकार दिला . 10 हजार रुपये चे नियोजन तोकडे असल्यामुळे मित्रांना मी माझे काम सांगितले त्यांना सर्वांना आवडले. मंत्रालयातील माझे सहकारी वर्गाने सुद्धा यात योगदान दिले व 40 हजार रुपये आपण जमा केले. यासाठी राज्यभरातून प्रतिसाद मिळाला. लाभार्थी कुटुंबे हरिपूर हे अत्यंत प्रेक्षणीय ठिकाण असून कृष्णा-वारणा संगमावर वसलेले आहे. गावातील 150 कुटुंबाचे घरे पुरामुळे उध्वस्त झाले आहेत. यासाठी आम्ही आधी ठरवलेले पिण्याच्या पाण्याच्या बॉटल देण्याचे नियोजन रद्द केले कारण 10000 प्लास्टिक बॉटल चा कचरा निर्माण होण्या...

संयुक्त गट ब मुख्य परीक्षा पेपर कसा सोडवावा ?

Image
🔰 संयुक्त मुख्य परीक्षा  My Strategy : मित्रांनो बरेच जण फोन करून शेवटचे 7 दिवसांत काय करावे व पेपर कसा सोडवावा विचारत आहेत . 50+30+20 चा नवीन पॅटर्न नुसार ही दुसरी परीक्षा होत आहे. मागील वर्षी 81 मार्क मिळवून मी राज्यात पेपर 1 मध्ये पहिला होतो.त्यामुळे तुम्हां सर्वांना मी काही Tips देऊ इच्छितो. 1) अपवाद : मराठी आणि इंगजी व्याकरणाच्या नियमातील सर्व काही पाठ करायच्या भानगडीत न पडता फक्त अपवाद पुन्हा एकदा वाचा ,लक्षात ठेवा. प्रश्न नेहमी 'अपवाद'वरच येत असतात. 2) मो रा वाळिंबे सतत Revise करा. पाल सूरी मधील 100 Common Error टॉपिक कमीत कमी 3 वेळा वाचा. vocabulary रोज सकाळी Revise करा. 3) चालू घडामोडी वाचताना मागच्या 1 वर्षातील ठळक घडामोडी च वाचा.त्या वाचतांना त्या बातमितील वेगळेपण अधोरेखित करून लक्षात ठेवा,आयोग नेहमी 3-4 वाक्य टाकून प्रश्न विचारते ,त्यामुळे चुकीचे उत्तर चटकन लक्षात येत नाही. 4) माहिती अधिकार व सेवा हक्क कायदा तोंडपाठ करा. 1-1 मार्क हा महत्त्वाचा आहे. 5)पेपर सोडवत असतांना Elimination Method काळजीपूर्वक वापरा. जोड्या लावा चे प्रश्न ,चार पैकी एक बरोबर...

एकाचवेळी 3 पदांवर निवड

Image
*आडगाव-जेहुर येथील धीरज चव्हाण यांची 3 परीक्षेत बाजी* ऑक्टोबर 2018 मध्ये MPSC द्वारे घेण्यात आलेल्या राज्य कर निरीक्षक परीक्षेत आडगाव-जेहुर येथील भूमिपुत्र धीरज नामदेवराव चव्हाण यांची 2 ऱ्या क्रमांकाने निवड झाली आहे ,तसेच आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या मंत्रालय सहायक कक्ष अधिकारी परीक्षेत देखील त्यांनी 29 व्या क्रमांकाने बाजी मारली आहे .नुकत्याच नोव्हेंबर मध्ये राज्य गृह विभागात ,न्यायवैद्यक प्रयोगशाळेत ,सहायक वैज्ञानिक पदी त्यांची राज्यात 11 व्या क्रमांकाने निवड झाली होती.3 पदे मिळवल्यामुळे पंचक्रोशीत आनंद व्यक्त होत आहे.त्यांचे वडील नामदेवराव चव्हाण वासडी के प्रा शा येथे मुख्याध्यापक पदावर आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी उपसभापती गीतराम पवार व गणेश शिंदे ,आडगाव चे सरपंच ज्ञानेश्वर निकम ,बिबखेडा येथील सरपंच आप्पासाहेब काळे ,सोसायटी चेयरमान अप्पासाहेब चव्हाण ,बाळूशेठ पवार ,संजय रिंढे, बाळू रिंढे,देविदास रिंढे ,अप्पा मंत्री ,शिवाजी पवार ,निवृत्ती शिंदे,शरद निकम ,विठ्ठल चव्हाण,दिनकर जठार ,बाळू झिमन ,निलेश शिंदे ,पूनम गायकवाड ,बाबासाहेब बहिरव ,संतोष चव्हाण,अक्षय झिमन ,...

SEBC ( मराठा आरक्षण ) जातीचे प्रमाणपत्र कसे काढायचे ? वाचा संपूर्ण प्रक्रिया

Image
मराठा समाजाने विविध आंदोलन काढून आता पर्यंत मराठा आरक्षणाचा लढा लढला होता आणि आता त्या लढ्याला यश आले आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणाचा कायदा लागू केला आहे. विधीमंडळात मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. तर, राज्यपालांच्या सहीनंतर हा कायदा 1 डिसेंबरपासून राज्यात लागू झाला आहे. आता अनेकांना मराठा आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी काय करावे लागेल हे माहिती नाही. तर मराठा बांधवानी सर्वात अगोदर जात प्रमाणपत्र काढून घ्यावे लागेल. जातीचे प्रमाणपत्र काढल्यानंतरच मराठ्यांना आरक्षणाचा फायदा मिळणार आहे.तर पुढे पाहूया कसे जातीचे प्रमाणपत्र काढायचे तुमचा जातीचा पुरावा – सर्वप्रथम तुमच्या नावापुढे “मराठा” असा उल्लेख असणारा इयत्ता पहीली ते इयत्ता बारावी पर्यंतच्या कोणत्याही एका वर्गातील तुमचा शाळा सोडल्याचा दाखला काढा. पुर्वीच काढलेला असेल तर त्यापैकी एकाची सत्यप्रत(True Copy) घ्या. जर तुम्हाला असा दाखला मिळाला नाही आणि तुम्ही महाविद्यालयात शिकत असाल तर तिथुन बोनाफाइड सर्टिफिकेट काढा. परंतु बोनाफाइडवर तुमच्या जन्मतारीख व जातीचा उल्लेख असायला हवा, याची काळजी घ्या. 1...

पैठणी साडीचा इतिहास व माहिती

Image
ताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे कुंच्या टोपडी शेले शाली त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी नारळी पदर जरी चौकडी रंग तिचा सुंदर धानी कवयित्री शांता शेळके यांनी पैठणीचे स्त्रीजनात असलेले हळवे स्थान मोजक्या शब्दांत किती सुंदरपणे गुंफले आहे! पैठणी म्हणजे महाराष्ट्रातील भरजरी पारंपरिक वस्त्रप्रकार. गर्भरेशमी, संपूर्ण जरीचा पदर आणि रुंद व ठसठशीत वेलबुट्टीचे काठ... पैठणीची ही प्राथमिक ओळख, तर संपूर्ण काठावर दोन्ही बाजूंनी एकसारखी वेलबुट्टी दिसणे हे तिचे खास वै‌शिष्ट्य. कपाट ढीगभर साड्यांनी भरलेले का असेना, विशेष प्रसंगी ठेवणीतील पैठणीच हवी, असा तमाम महिलावर्गाचा हट्ट असतो. त्यात ‘गृहमंत्री’ ठरवण्यासाठीच्या टीव्हीवरील ‘शो’ने पैठणी जिंकण्याच्या स्पर्धेला जन्म देऊन पैठणीप्रेमात भर घातली आहे.  नऊवारी ही मराठी स्त्रीची ओळख, तर पैठणी हे तिचे महावस्त्र! मराठा काळात पैठणची पैठणी महिलांमध्ये लोकप्रिय होती. पैठणीची रंगसंगती आणि पायाजवळच्या काठावर व पदरावर केले जाणारे जरीकाम तिला मौलिक ठेव्याचे वजन प्राप्त करून देत. मराठे स ...

ऑपरेशन पोलो व मराठवाडा मुक्तिसंग्राम

Image
ऑपरेशन पोलो  हैदराबाद विलीनीकरणासाठी भारतीय सेनेचे ऑपरेशन पोलो-  भारतीय सैन्याची हैदराबादवर चढाई. निजामाच्या असफिया घराण्याची राजवट १७२४ ते १९४८ पर्यंत सुमारे सव्वा दोनशे वर्षे होती. मीर उस्मान अलीखान बहादूर हे असफिया घराण्याचे सातवे राजे, त्यांची महत्वाकांक्षा मोठी होती.भारतात महत्वाच्या ठिकाणी मुस्लिम सत्तेचे अधिराज्य असावे असे त्यांना वाटत होते.हैदराबाद राज्याचे एकूण १६ जिल्हे होते. त्यात आंध्राचे ८, मराठवाड्याचे ५ व कर्नाटकाचे ३ जिल्हे होते. असे तेलगू, मराठी व कानडी भाषिक नागरिकांचे हैदराबाद संस्थान होते. नागरिकांच्या मातृभाषेला दुय्यम स्थान होते. राज्याची मुख्य भाषा म्हणून उर्दूला स्थान होते. सरकारी माध्यम उर्दू होते. त्यामुळे उर्दू हीच राज्याची भाषा सक्तीची होती. सर्व व्यवहार उर्दू माध्यमाद्वारे होत. प्राथमिक शाळेपासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत उर्दू माध्यमाद्वारे शिक्षण घ्यावे लागत असे. हैदराबाद संस्थान हे मुस्लिम राष्ट्र व्हावे म्हणून निजामाने भारतातील अरबी, फारशी भाषेच्या विद्वानांना बोलावून त्यांच्या प्रमुख जागी नियुक्त्या केल्या. हैदराबाद संस्थान हे देशात...