Posts

शनी नस्तनपुरच्या खोजा राजाची अनोखी गढी...!

Image
      नाशिक जिल्ह्यातील नांदगांव तालुक्यात प्रभू रामचंद्र यांनी स्थापन केलेले शनी महाराज देवस्थान श्रीक्षेत्र नस्तनपुर येथे आदिवासी भिल्ल राजा खोजा नाईक याची भुईकोट किल्लेवजा गढी नामशेष होण्याच्या वाटेवर आहे.            नस्तनपुर परिसरात भिल्ल समाजाची वस्तीत खोजा नाईक शेती करून उदरनिर्वाह करीत असे. तो शनी महाराजांचा भक्त , कोणतेही काम शनी देवतेचे स्मरून तो करी. एके दिवशी शेतात नांगरणी सुरू असता दगडात नांगर अडकताच तो सोन्यासारखा चमकू लागला. काही वेळात तो दगड म्हणजे ' परिस ' असल्याचे त्याच्या लक्षात आले. अशा त-हेने तो अल्पावधीतच गर्भ श्रीमंत झाला. पुढे त्याला आपल्याकडे असलेल्या संपत्तीच्या संरक्षणासाठी गढी बांधण्याच त्यानं ठरवलं , गढीच्या पायात एका बुरूजात श्री गणेशाची स्थापना करून त्याने सुंदर गढी उभारली ती ही गढी आज शेवटच्या घटका मोजत आहे.         या गढीतनं खोजा राजाला " दिल्लीचा दिवा " पहायचा होता म्हणुन उंचच उंच बुरूज निर्माण करण्याची त्याची ईच्छा होती.       इंग्रजांकडुन मुंबई भुसावळ रेल्वे लाईन टाकण्यासाठी सर्वेक्षण काम सुरू होते. त्या कामात खोजा राजाची गढीच्या

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या गावाकडील मित्रांना पुस्तके भेट

Image
 

आज वासडी (कन्नड) येथे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली.सोबत मंचावर उपस्थित श्री अशोक बनकर सर(अप्पर पोलीस अधीक्षक ,गोंदिया),श्री समीर दानेकर सर (उप अधीक्षक भूमी अभिलेख,घनसावंगी) व इतर मान्यवर

Image
 

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन विशेष :- क्रांतिवीर काकासाहेब

Image
  क्रांतिवीर काकासाहेब देशमुख यांच्यासह कन्नड तालुक्यातील असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी केला निजामविरुध रक्त रंजित संघर्ष :---- देवगिरीचे साम्राज्य अंगाखांद्यावर खेळलेला मराठवाडा तब्बल दोनशे वर्षे गुलामीच्या जोखड्यात बांधलेला होता. मीर उस्मान अली खान याने त्याच्या सातव्या निजामाने कूटनीती व दहशतीच्या जोरावर जनतेला सर्व अपंग केले होते. हैदराबाद संस्थानातील जनतेचा असंतोष दडपून टाकण्यासाठी त्याने क्रूरकर्मा कासिम रझवी याला उभा केले होते. या रझाकाराच्या अत्याचाराने जनता हैराण झाली होती. आणि अखेर रझाकाराच्या अत्याचाराच्या विरोधात गौताळ्याची रानावनातील गवताची पाती पेटून उठली. गौताळ्याच्या गवताला भाले फुटले आणि सुरु झाला रक्त रंजित संघर्ष. आणि या संघर्षाचे नेतृत्व केले कन्नड तालुक्यातील करंजखेड या गावातील एका तरुणाने केलं त्या तरुणाचं नाव होतं क्रांतिसिंह काकासाहेब देशमुख. काकासाहेब देशमुख यांच्या रूपाने जनतेला एकच सेनापती मिळाला. शोषितांच्या असंतोषाला आवाज मिळाल्याने जनतेच्या मनात संघर्षाचे बळ निर्माण झाले. आणि क्रांतिवीर काकासाहेब यांनी मराठवाडा मुक्तीसाठी निझामाविरुध रणशिंग फुंकले. कन्नड

कन्नड ते चाळीसगाव दरम्यानच्या औट्रम घाटाचा इतिहास

Image
हा घाट महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा 2 नंबरचा घाट आहे. 9 किलोमीटरच्या घाटास 29 वळणं असून 4 वळणं अतिशय  धोकेदायक असे बरोबर व्ही आकाराचे आहेत. घाटास लागून आजूबाजूस पाटणादेवी अभयारण्य आहे. बिबटे ,लांडगे  अशा असंख्य वन्य प्राण्यांचा अगदी  घाटापर्यंत वावर असतो. निसर्ग संपन्न असलेला हा परिसर मन मोहित करतो. अनेक धबधबे पावसाळ्यात घाटातून प्रवास करताना नजरेस पडतात. चाळीसगाव पासून हा घाट 8 किलोमीटर अंतरावर आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वर 9 किमी लांबीच्या महाराष्ट्रातील प्रमुख घाटापैकी एक असणार्‍या कन्नड चाळीसगाव दरम्यानच्या ओट्राम घाटाच्या निर्मितीचा इतिहास मोठा रंजक आहे. उत्तर भारतातून दक्षिणेत जाण्यासाठी अजिंठ्याचा डोंगर पालथा घालवा लागतो. याकरिता आपणास रांजनगाव आणि अजिंठा पास फर्दापूर येथून जावे लागते.  प्राचीनकाळी मात्र खानदेशातून मराठवाड्यात येण्यासाठी विविध नावाने छोटे मोठे घाट होते. ज्याची आज फक्त नावानेच चर्चा करावी लागते.  1. कालघाट – पाटणा ते आंबा ( कन्नडजवळील पाटणा गणितीतज्ञ भास्कराचार्याचे गाव  2. घायघाट – अहंकारी ते आंबा 3. गणेशघाट – पाटणा ते कलंकी  4. हणवत घाट – पिंपळनेर

औरंगाबादच्या नामांतराचा इतिहास

Image
इस पूर्व 250 ते इस 250 सातवाहन काळ - राजतडाग इस 1610 - खडकी इस 1626 - फत्तेनगर इस 1636 - खुजिस्ता बुनियाद इस 1657 - औरंगाबाद  29 जून 2022 - संभाजीनगर 15 जुलै 2022 - छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीराजे यांची अविस्मरणीय छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) भेट !!! छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला जाण्यापूर्वी औरंगाबादेस मुक्काम केला होता. ही नोंद जयपूर रेकॉर्ड्समध्ये 'हाऊस ऑफ शिवाजी', 'जदुनाथ सरकार' आणि 'सय्यद हुसैन बिलग्रामी' यांच्या नावाने केलेली आढळते. वसंत ॠतूत शहर हिरवळीच्या चादरीने नटले होते. शिवाजी महाराजांचे याच मोसमात शहरात आगमन झाले. तो दिवस होता ५ मार्च १६६६. ज्येष्ठ सुपुत्र संभाजी राजे त्यांच्यासमवेत होते.बादशहा औरंगजेबाच्या निमंत्रणावरून महाराज आग्र्याला जाण्यासाठी आपल्या प्रमुख सरदारांना सोबत घेऊन निघाले होते. राजपूत राजे जयसिंग यांच्या आग्रहाखातर महाराजांनी औरंगाबाद शहरात मुक्काम ठेवला.त्यांच्यासमवेत हिरोजी फर्जंद, भोसले, तानाजी, येसाजी कंक, बाजीराव सर्जेराव जेधे आणि निवडक ४००सरदार होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनाची खबर शहरा

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रोख मदत

Image
  मराठवाड्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या 14 शेतकऱ्यांना(प्रत्येकी 3-5 हजार) दिवाळी भेट म्हणून आपल्या अधिकारी-कर्मचारी मित्र मंडळातर्फे 60 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. सहकार्य केल्याबद्दल सर्व अधिकारी कर्मचारी मित्रांचे धन्यवाद🙏🙏🙏 दिवाळीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा 💐💐💐

मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया | Chief Minister's Relief Fund, Maharashtra

Image
मुख्यमंत्री सहायता निधी  Chief Minister's Relief Fund, Maharashtra    या सेवेमार्फत आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत त्यांना दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी शासनामार्फत अर्थसहाय्य्य केलं जातं. पात्रता : ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी आहे असे घटक हे अर्थसहाय्य्य मिळवण्यासाठी पात्र आहेत. नमूद आजार : हृदयशस्रक्रिया, किडणी, कर्करोग, मेंदु वरील उपचार, लिवर ट्रान्सप्लांट, अतिदक्षता विभागातील नवजात बालके, कोकलर इम्प्लांट सर्जरी (cochlear implant surgery) तसेच बोन मॅरो ट्रान्सप्लांट या आजारांवर उपचारासाठी हे अर्थसहाय्य दिलं जातं.  ★ हे अर्थसहाय्य मिळवण्याच्या प्रक्रियेतील 3 टप्पे :- A. अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे जमा करणे. B. ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करणे. C. कागदपत्रे जोडलेला अर्ज मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात सादर करणे. A. अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे जमा करावेत १. अर्जदाराचा  ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज    २. रुग्णाचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड (रेशन कार्डमध्ये रुग्णाचे नाव नमूद असणे गरजेचे आहे) ३.  तहसीलदार यांनी प्रमाणित केलेला उत्पनाचा दाखला

Facebook चा वापर करताय सायबर गुन्हेगार : या सायबर हल्ल्यापासून सावधान राहा #CyberFraud

Image
 ★ *जाहीर आवाहन* ★ ⚡#Very_IMP_for_Facebook_user's 👉 *गेल्या काही दिवसांपासून प्रतिष्ठित व्यक्ती, युनिफॉर्मवर फोटो असलेल्या पोलीस आणि सुरक्षा दलातील लोकांच्या नावाचे सेम अकाऊंट फेसबूकला तयार करून तेच नाव, तोच प्रोफाइल फोटो ॲड करून ओरीजनल अकाऊंटच्या फ्रेंडलिस्ट मधिल मित्रांना रिक्वेस्ट पाठवली जाते*..   *रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्यानंतर लगेच मॅसेंजरला Hii पाठवून #पैशांची #मागणी केली जाते व त्यासाठी अकाऊंट नंबर देखील पुरवला जातो.*  *👉हे ओळखण्यासाठी काही गोष्टी नोटीस कराव्यात*....  *  1) जो कुणी आपला प्रतिष्ठीत मित्र आहे आणि तो आधीच आपल्या फ्रेंडलिस्टमधे असताना पुन्हा आलेली रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू नये. 2) नवीन आलेली फ्रेंड रिक्वेस्ट शक्यतो ज्याची आहे त्याला पर्सनली व्हेरीफाय करूनच ॲक्सेप्ट करावी. 3) #फेक #रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्यानंतर लगेच तो मॅसेंजरला येऊन Hii करतो. 4) मॅसेंजरवर तो #हिंदीत / #इंग्रजी मध्ये #संभाषण करतो. 5)माझे आधीचे अकाउंट काही कारणाने बंद झालंय असे सांगतो.. 6) पैशांची अर्जंट गरज आहे अस सांगू शक्यतो Paytm खाते क्रमांक देतो. 7) *अशा कुठल्याच पैश्यांच्या मागणीला बळी पडू नक

10 वी 12वी नंतर विविध क्षेत्रातील करियरची संधी व मार्गदर्शन

Image
मोफत मार्गदर्शन 👆10 वी 12वी नंतर विविध क्षेत्रातील करियरची ओळख व मार्गदर्शनाची  राज्यातील सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सध्या  गरज आहे. https://youtu.be/mOUcBO7DE0g  सर्वांना नम्र विनंती की ही लिंक आपल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शेयर करावी 🙏🙏🙏

सांगली-कोल्हापूर भागातील पूरग्रस्तांना मदत मोहीम

Image
दिनांक 25 ऑगस्ट 2019 रोजीच्या माझा आणि वर्षाचा साखरपुड्याचे नियोजन महिनाभरापासून चालू होते. याच दरम्यान सांगली-कोल्हापूर भागातील पुराच्या बातम्या बघत होतो.अचानक उद्भवलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले होते. इकडे मी माझ्या संसार बसवण्याचा मार्गावर होतो.मनात बेचैन होतो ,कारण साखरपुड्यावरील अनावश्यक खर्च कसा टाळावा. मनात विचार सुचला की आपण हा खर्च टाळून पूरग्रस्त भागातील संकटग्रस्त कुटुंबांना मदत करावी. मग काय आधी बायकोला यासंबंधी मत विचारले ,तिने होकार दिला ,नंतर घरच्यांनी सुद्धा होकार दिला . 10 हजार रुपये चे नियोजन तोकडे असल्यामुळे मित्रांना मी माझे काम सांगितले त्यांना सर्वांना आवडले. मंत्रालयातील माझे सहकारी वर्गाने सुद्धा यात योगदान दिले व 40 हजार रुपये आपण जमा केले. यासाठी राज्यभरातून प्रतिसाद मिळाला. लाभार्थी कुटुंबे हरिपूर हे अत्यंत प्रेक्षणीय ठिकाण असून कृष्णा-वारणा संगमावर वसलेले आहे. गावातील 150 कुटुंबाचे घरे पुरामुळे उध्वस्त झाले आहेत. यासाठी आम्ही आधी ठरवलेले पिण्याच्या पाण्याच्या बॉटल देण्याचे नियोजन रद्द केले कारण 10000 प्लास्टिक बॉटल चा कचरा निर्माण होण्या

संयुक्त गट ब मुख्य परीक्षा पेपर कसा सोडवावा ?

Image
🔰 संयुक्त मुख्य परीक्षा  My Strategy : मित्रांनो बरेच जण फोन करून शेवटचे 7 दिवसांत काय करावे व पेपर कसा सोडवावा विचारत आहेत . 50+30+20 चा नवीन पॅटर्न नुसार ही दुसरी परीक्षा होत आहे. मागील वर्षी 81 मार्क मिळवून मी राज्यात पेपर 1 मध्ये पहिला होतो.त्यामुळे तुम्हां सर्वांना मी काही Tips देऊ इच्छितो. 1) अपवाद : मराठी आणि इंगजी व्याकरणाच्या नियमातील सर्व काही पाठ करायच्या भानगडीत न पडता फक्त अपवाद पुन्हा एकदा वाचा ,लक्षात ठेवा. प्रश्न नेहमी 'अपवाद'वरच येत असतात. 2) मो रा वाळिंबे सतत Revise करा. पाल सूरी मधील 100 Common Error टॉपिक कमीत कमी 3 वेळा वाचा. vocabulary रोज सकाळी Revise करा. 3) चालू घडामोडी वाचताना मागच्या 1 वर्षातील ठळक घडामोडी च वाचा.त्या वाचतांना त्या बातमितील वेगळेपण अधोरेखित करून लक्षात ठेवा,आयोग नेहमी 3-4 वाक्य टाकून प्रश्न विचारते ,त्यामुळे चुकीचे उत्तर चटकन लक्षात येत नाही. 4) माहिती अधिकार व सेवा हक्क कायदा तोंडपाठ करा. 1-1 मार्क हा महत्त्वाचा आहे. 5)पेपर सोडवत असतांना Elimination Method काळजीपूर्वक वापरा. जोड्या लावा चे प्रश्न ,चार पैकी एक बरोबर

एकाचवेळी 3 पदांवर निवड

Image
*आडगाव-जेहुर येथील धीरज चव्हाण यांची 3 परीक्षेत बाजी* ऑक्टोबर 2018 मध्ये MPSC द्वारे घेण्यात आलेल्या राज्य कर निरीक्षक परीक्षेत आडगाव-जेहुर येथील भूमिपुत्र धीरज नामदेवराव चव्हाण यांची 2 ऱ्या क्रमांकाने निवड झाली आहे ,तसेच आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या मंत्रालय सहायक कक्ष अधिकारी परीक्षेत देखील त्यांनी 29 व्या क्रमांकाने बाजी मारली आहे .नुकत्याच नोव्हेंबर मध्ये राज्य गृह विभागात ,न्यायवैद्यक प्रयोगशाळेत ,सहायक वैज्ञानिक पदी त्यांची राज्यात 11 व्या क्रमांकाने निवड झाली होती.3 पदे मिळवल्यामुळे पंचक्रोशीत आनंद व्यक्त होत आहे.त्यांचे वडील नामदेवराव चव्हाण वासडी के प्रा शा येथे मुख्याध्यापक पदावर आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी उपसभापती गीतराम पवार व गणेश शिंदे ,आडगाव चे सरपंच ज्ञानेश्वर निकम ,बिबखेडा येथील सरपंच आप्पासाहेब काळे ,सोसायटी चेयरमान अप्पासाहेब चव्हाण ,बाळूशेठ पवार ,संजय रिंढे, बाळू रिंढे,देविदास रिंढे ,अप्पा मंत्री ,शिवाजी पवार ,निवृत्ती शिंदे,शरद निकम ,विठ्ठल चव्हाण,दिनकर जठार ,बाळू झिमन ,निलेश शिंदे ,पूनम गायकवाड ,बाबासाहेब बहिरव ,संतोष चव्हाण,अक्षय झिमन ,

SEBC ( मराठा आरक्षण ) जातीचे प्रमाणपत्र कसे काढायचे ? वाचा संपूर्ण प्रक्रिया

Image
मराठा समाजाने विविध आंदोलन काढून आता पर्यंत मराठा आरक्षणाचा लढा लढला होता आणि आता त्या लढ्याला यश आले आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणाचा कायदा लागू केला आहे. विधीमंडळात मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. तर, राज्यपालांच्या सहीनंतर हा कायदा 1 डिसेंबरपासून राज्यात लागू झाला आहे. आता अनेकांना मराठा आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी काय करावे लागेल हे माहिती नाही. तर मराठा बांधवानी सर्वात अगोदर जात प्रमाणपत्र काढून घ्यावे लागेल. जातीचे प्रमाणपत्र काढल्यानंतरच मराठ्यांना आरक्षणाचा फायदा मिळणार आहे.तर पुढे पाहूया कसे जातीचे प्रमाणपत्र काढायचे तुमचा जातीचा पुरावा – सर्वप्रथम तुमच्या नावापुढे “मराठा” असा उल्लेख असणारा इयत्ता पहीली ते इयत्ता बारावी पर्यंतच्या कोणत्याही एका वर्गातील तुमचा शाळा सोडल्याचा दाखला काढा. पुर्वीच काढलेला असेल तर त्यापैकी एकाची सत्यप्रत(True Copy) घ्या. जर तुम्हाला असा दाखला मिळाला नाही आणि तुम्ही महाविद्यालयात शिकत असाल तर तिथुन बोनाफाइड सर्टिफिकेट काढा. परंतु बोनाफाइडवर तुमच्या जन्मतारीख व जातीचा उल्लेख असायला हवा, याची काळजी घ्या. 1